Type Here to Get Search Results !

FTII मध्ये शेवटच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या!



पुणे : पुण्यातील एफटीआयआय मध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केली.अश्विन शुक्ला असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, 'पुण्यातील लॉ कॉलेज रस्त्यावर असणाऱ्या 'एफटीआय' मध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती डेक्कन पोलिसांना मिळाली.त्यानंतर डेक्कन पोलीस स्टेशनचे  मार्शल घटनास्थळी दाखल झाले. अश्विन शुक्ला असे हा एफटीआयआय मधील बॉईज हॉस्टेलमध्ये राहत होता.आज सकाळी नऊ वाजता त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले. अश्विन शुक्ला हा मुळचा गोवा येथील रहिवासी आहे. एफटीआयआयमध्ये तो शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत होता. 



दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर डेक्कन पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies