Type Here to Get Search Results !

आटपाडी I मीना जावीर आत्महत्या नव्हे खून I तिघांवर आटपाडी पोलीसात गुन्हा दाखल I जबरदस्तीने बियर मधून पाजले विषारी औषध

आटपाडी : येथील मीना बाबासाहेब जावीर या महिलेच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून पोलीस तपासात, मीना जावीर या महिलेला बियर मधून विषारी औषध देवून तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, मीना बाबासाहेब जावीर ही आरोपींना  पैसे मागत होती.तसेच पैसे नाही दिले तर त्यास बदनामी करण्याची धमकी देत होती.  याचा राग मनात ठेवून  आरोपींनी बियर मधून मीना जावीर हिला दिनांक 27/6/2022 रोजी  पाजून ती मयत झालेची खात्री करून निघून गेल्या.

या प्रकरणी पोना दादासाहेब ठोंबरे यांनी फिर्याद दिली असून कलम 302,24 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाणे करीत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies