Type Here to Get Search Results !

राज्यात तरुणाईची ITI प्रवेशाला सर्वाधिक पसंती!



पुणे : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची (आयटीआय) पहिली प्रवेश फेरी जाहीर झाली असून, राज्यात ४० हजार ७१० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. यामध्ये इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, कॉम्पुटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट व मेकॅनिक डिझेल या ट्रेडला सर्वाधिक पसंती मिळत आहे.


 

दहावीनंतर झटपट रोजगाराचा मार्ग म्हणून आयटीआयकडे पाहण्यात येते. राज्यात दोन लाख ४८ हजार ७९६ विद्यार्थ्यांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण केली आहे. पहिल्या फेरीत ९२ हजार १४० विद्यार्थ्यांचे ॲलॉटमेंट जाहीर करण्यात आले आहे. त्यापैकी ४० हजार ७१० विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत प्रवेश घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.



सरकारी आयटीआयला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. ४० हजारांपैकी ३१ हजार ४७३ विद्यार्थ्यांनी सरकारी आयटीआयमध्ये, तर उर्वरित नऊ हजार २३७ विद्यार्थ्यांनी खासगी आयटीआयमध्ये प्रवेश निश्चित केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies