Type Here to Get Search Results !

क्रेडिट-डेबिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी RBI ने केले नवे नियम लागू; जाणून घ्या...!नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी नवा नियम लागू केला आहे. ३० सप्टेंबर २०२२ पूर्वी ऑनलाइन, पॉइंट-ऑफ-सेल आणि अॅप-मधील व्यवहारांमध्ये वापरले जाणारे सर्व क्रेडिट आणि डेबिट कार्डचा डेटा सेव असणे अनिवार्य आहे. हा डेटा युनीक टोकनने रीप्लेस करणे अनिवार्य आहे. यामुळे ग्राहकांचे व्यवहार सुरक्षित होणार आहेत.या टोकन्सच्या मदतीने ग्राहकांना त्यांची माहिती उघड न करता व्यवहार करता येणार आहेत. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, मुळ कार्ड डेटा एनक्रिप्टेड डिजिटल टोकनसह बदलणे अनिवार्य आहे, आणि टोकनीकरणामुळे तुमचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड व्यवहार अधिक सुरक्षित आणि अधिक सोयीस्कर होणार आहेत, अस आरबीआयने म्हटले आहे.


या टोकनच्या मदतीने कार्डधारकांचे ऑनलाइन व्यवहार अधिक सुरक्षित होणार आहेत. आणि कार्डशी संबंधित माहिती ऑनलाइन फसवणुकीपासून सुरक्षित होणार आहे. ग्राहकांना असुरक्षित ऑनलाइन घोटाळ्यांपासून सुरक्षित ठेवता यावे यासाठी आरबीआयने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, डेबिट आणि क्रेडिट कार्डशी संबंधित कोणतीही माहिती केवळ कार्ड जारी करणार्या् नेटवर्कद्वारे संग्रहित केली जाऊ शकते आणि त्यांच्याशिवाय कोणीही ती माहिती घेऊ शकत नाही. तसेच आधीचा संग्रहित केलेला सर्व डेटा आता हटवावा लागणार आहे.टोकनायझेशन प्रणाली पूर्णपणे विनामूल्य असणार आहे. या प्रक्रियेला कोणताही खर्च नसणार आहे.हे फक्त देशांतर्गत ऑनलाइन व्यवहारांसाठी लागू असेल. डेबिट आणि क्रेडिट कार्डसाठी नवीन नियम १ जुलै २०२२ पासून लागू होणार होते, पण ते पुढे ढकलण्यात आले. आणि आता टोकनीकरणाची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२२ असणार आहे.टोकन कसे तयार करायचे?

१) काहीतरी खरेदी करण्यासाठी कोणत्याही ई-कॉमर्स वेबसाइट किंवा अॅपला भेट द्या आणि पेमेंट प्रक्रिया सुरू करा.

२) तुमचे कार्ड निवडा, चेक आउट करताना तुमचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड तपशील यात भरा.

३) कार्ड सुरक्षित करा, RBI मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तुमचे कार्ड टोकनाइज करण्यासाठी "RBI मार्गदर्शक तत्त्वांनुसार तुमचे कार्ड सुरक्षित करा" हा पर्याय निवडा.

४) टोकन तयार करण्यास अनुमती द्या. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बँकेने मोबाईल फोन किंवा ईमेलवर पाठवलेला OTP यात भरा.

५) टोकन तयार करा. तुमच्या कार्डवरील माहिती आता टोकनने बदलला आहे.

६) पुढच्या वेळी तुम्ही त्याच वेबसाइट किंवा अॅपवर पेमेंट करणार असाल तेव्हा तुमच्या कार्ड नंबरचे शेवटचे चार अंक तुम्हाला दिसतील.(सौ. साम)Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies