मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि विद्यार्थींना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे यासाठी दहावी(SSC), बारावीच्या(HSC) मार्च 2023 च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
दहावीची लेखी परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे. तर 12 वीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2023 या कालावधीत होणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.
दरम्यान, हे संभाव्य वेळापत्रक असून निश्चित वेळापत्रकाबाबतची माहिती शाळांना दिली जाणार आहे. त्या सुधारित वेळापत्रकानुसार परीक्षा घेतल्या जाणार आहेत.