Type Here to Get Search Results !

‘यांनी’ मिळवले ‘खतरों के खिलाडी 12’चे विजेतेपद; ट्रॉफीसोबतच ‘इतक्या’ लाखांचे मिळाले बक्षीस!



मुंबई: एकापेक्षा एक खतरनाक स्टंट्स करत कोरिओग्राफर तुषार कालियाने ‘खतरों के खिलाडी 12’चे विजेतेपद पटकावले आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीने या शोचे  सूत्रसंचालन केले होते. जुलैपासून हा शो सुरू झाला होता. त्याचा ग्रँड फिनाले रविवारी पार पडला. 



खतरों के खिलाडीच्या ट्रॉफीसोबतच तुषारला 20 लाख रुपयांचा चेक बक्षिस म्हणून मिळाला. याशिवाय एक कारसुद्धा त्याला भेट म्हणून मिळाली. 



दरम्यान, बाराव्या सिझनमध्ये मोहित मलिक, रुबिना दिलैक, फैजल शेख, जन्नत जुबैर, तुषार कालिया यांच्यासोबतच शिवांगी जोशी, प्रतिक सेहजपाल, निशांत भट्ट, एरिका फर्नांडिस, चेतना पांडे, अनेरी वजनी, श्रीती झा, कनिका मान, राजीव अडातिया यांनी भाग घेतला होता.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies