Type Here to Get Search Results !

तरुणाने अमिष दाखवून 15 वर्षीय मुलीवर सतत केला अत्याचार!



नांदेड:  नांदेडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर नात्यातील तरुणाने अमिष दाखवून वारंवार अत्याचार केला .या अत्याचारातून मुलगी गर्भवती राहिली. या प्रकरणी सोनखेड पोलिस ठाण्यात युवकावर आज बलात्कार आणि पोस्को कायद्या अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, लोहा तालुक्यातील शेवडी येथे तरुणाने नात्याचा फायदा घेऊन एका 15 वर्षाच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला विविध अमिष दाखवून शारिरीक संबध ठेवले. यातून मुलगी गर्भवती राहीली. 


दरम्यान, या प्रकाराची माहिती समजताच तिच्या आईने पोलीस ठाणे गाठले. संबंधित युवकावर पोलिसांनी बलात्कारसह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies