मुंबई : खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचं कौतुक करत विरोधकांना टोला लगावला आहे.
श्रीकांत शिंदे म्हणाले, आता शिंदेसाहेब चांगलं काम करत आहेत. विरोधकांना पूर्ण वेळ केवळ शिंदेसाहेबच दिसतात. स्वप्नामध्ये पण शिंदे साहेब येतात. सगळ्यांच्या म्हणजे शिंदेसाहेब गणेश उत्सवामध्ये ज्या प्रकारे फिरले. फक्त गणेश उत्सव नाही, त्याबरोबर शासकीय कामकाज सरकारचे निर्णय घेण्याचे निर्णय शिंदे साहेबांनी घेतले. एवढ्या मोठ्या प्रमाणात हा माणूस काम कसा करू शकतो? असा प्रश्न विरोधकांना पडलाय, असे शिंदे यांनी वक्तव्य केले.
तसेच ते पुढे म्हणाले, “ दिवसातील 20 तास शिंदेसाहेब काम कसा करू शकतात? असं अनेकांना वाटतं. या सगळ्या गोष्टी आता डोळ्यांमध्ये खुपयला लागलेल्या आहेत. ही तर केवळ सुरुवात आहे. मी याआधीही सांगितलं आहे की ये तो झाकी है पिक्चर अभी बाकी है!, असे वक्तव्य करत श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.