मुंबईत शिवसेना-शिंदे गटात हाणामारी; 25 जणांवर गुन्हा दाखल!मुंबई - मुंबईच्या प्रभादेवीत परिसरात शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा झाला. अखेर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केल्याची माहिती समोर आली आहे.हा वाद मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली. दादर पोलीस स्टेशन परिसरातही दोन्ही गट आमनेसामने आले होते. यावेळी शिंदे गटात असलेले आमदार सदा सरवणकर यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात गोळीबार केल्याचा देखील आरोप आहे. यामध्ये विभागप्रमुख महेश सावंत थोडक्यात बचावले असल्याचा दावा शिवसेनेने केला. मात्र, सदा सरवणकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावलेत. एका घरगुती प्रकरणाचा वाद झाल्याचे सरवणकर यांनी सांगितले.दरम्यान, या प्रकरणी आता 25 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटातील संतोष तेलवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured