Type Here to Get Search Results !

आठवीतल्या मुलीवर 8 जणांनी केला सामुहिक बलात्कार अन त्यांनतर व्हिडीओ.....!राजस्थान: राजस्थानच्या अलवार  जिल्ह्यातील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या मुलीवर आठ जणांनी मिळून अत्याचार केला. या मुलीचा नराधमांनी अश्लिल व्हिडीओही बनवला होता. त्यानंतर त्यांनी या मुलीला व्हिडीओ सोशल मीडियावर टाकायची धमकी दिली आणि तिच्याकडून 50 हजार रुपयेही उकळले. आणि  त्यानंतर पीडितेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल केला. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.माहितीनुसार, 9 महिन्यांआधी तिच्यावर 8 युवकांनी अत्याचार केला होता. त्यांनी तिचे  अश्लिल फोटो काढले. नंतर ते फोटो देण्याच्या बहाण्याने मला बोलावलं आणि माझ्यावर जबरदस्ती केली, यानंतर जबरदस्ती कपडे उतरवायला लावले आणि माझा एक व्हिडीओ बनवला, तसेच, हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीसोबत नराधमांनी आळीपाळीने बलात्कार केला. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी नराधमांनी पीडितेला दिली. व्हिडीओ जर व्हायरल होऊ द्यायचा नसेल, तर आम्हाला दीड लाख रुपये दे, असं सांगून तिला ब्लॅकमेल केलं. सुरुवातीला पीडितेने 50 हजार रुपये कुठूनतरी जमवून दिले. पण एक लाख रुपये जमवणं तिला जमलं नाही. पैशांच्या लालसेनं बधिर झालेल्या नराधमांनी अखेर या मुलीला काढलेला अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल केला. तो नंतर पीडितेच्या घरातल्यांपर्यंत पोहोचला. त्यानंतर मुलीला कुटुंबीयांकडून विचारणा करण्यात आली. तेव्हा हे सगळं प्रकरण उघडकीस आले.दरम्यान, पीडितेच्या नातलगांनी अखेर पोलीस स्थानक गाठलं. तिच्या वडिलांनी आणि भावाने आठ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला. पॉक्सो कायद्यातंर्गत आणि आयटी कायद्याच्या खाली आता पोलिसांनी याप्रकरणी आठ नराधमांविरोधात गुन्हा नोंदवून घेतला आहे. मात्र अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies