दुबई : अशिया चषकामध्ये भारत-श्रीलंका सामन्यात श्रीलंकेने भारतावर मात केली असून शेवटच्या षटकात सह्नदार विजय साकारला. श्रीलंकेचा विजयाचे शिल्पकार कुशल मेंडीस, पथुका निसंका तसेच कर्णधार शनाका व राजपक्षे ठरले.
श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्याच षटकात महिषाने भारताला धक्का देताना लोकेश राहुलला पायचीत केले. लोकेश ६ धावांवर माघारी परतला. विराट कोहली दिलशान मदुशंकान च्या अप्रतिम यॉर्कर टाकून विराटला भोपळ्यावर ( ४ चेंडू) त्रिफळाचीत केले. १२ धावांवर २ फलंदाज गमावल्यानंतर रोहितने सूत्र हाती घेतली. सूर्यकुमार यादव संयमी खेळ करताना दिसला. भारताने आठव्या षटकात फलकावर ५० धावा पूर्ण केल्या. ४० धावांवर रोहितचा झेल सुटला. श्रीलंकेचा कर्णधार शनाकाने चेंडू टिपण्यासाठी डाईव्ह मारली, परंतु त्याचा प्रयत्न अपयशी ठरला.
चमिका करुणारत्नेने ही महत्त्वाची विकेट घेतली. रोहित ४१ चेंडूंत ५ चौकार व व ४ षटकारांसह ७२ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ शनाकाने सेट फलंदाज सूर्यकुमारला ( ३४) बाद केले. इथून पुन्हा भारताची गाडी घसरली. हार्दिक पांड्या ( १७), रिषभ पंत ( १७) व दीपक हुडा ( ३ ) धावांवर माघारी परतले. दिलशान मदुशंकाने २४ धावांत ३ विकेट्स घेतल्या. भारताला ८ बाद १७३ धावांपर्यंत मजल मारता आली.
धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली. निसंका व कुशल मेंडीस यांनी ९७ धावांची दमदार सलामी दिली. परंतु चहल ने ९७ धावांवरती सलामीचा निसंका व कुशल मेंडीस यांना बाद केले. पाठोपाठ असलंका देखील चहलच्या गोलंदाजीवर शून्यावर बाद झाल्याने श्रीलंकेची अवस्था ११० वर ३ झाली. तर अश्विनने गुणथहलिकाला शून्यावर बाद केल्याने श्रीलंका ११० वर ४ बाद अशा अवस्थेत आल्याने श्रीलंकेचे टेंशन वाढले होते. परंतु राजपक्षे १७ चेंडूत २५ धावा व कर्णधार शनाका १८ चेंडूत ३३ धावावर नाबाद राहत श्रीलंकेला विजय मिळवून दिला.