Type Here to Get Search Results !

आटपाडी : जबरी चोरीतील दोन आरोपींना आटपाडी पोलिसांनी केली अटकआटपाडी : आटपाडी पोलिसांनी घरनिकी येथे झालेल्या चोरीतील तसेच सांगोला तालुक्यातील खवासपुर येथे झालेली चोरीतील दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल तीन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, दिघंची येथे बिना नंबरप्लेटच्या मोटारसायकलवरुन दोन जण संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याबाबत संशयित इसमांना मोटारसायकल सह ताब्यात घेवून त्यांना त्यांची नाव-गाव विचारले असता त्यांनी आपली नावे- स्वप्नील दगडु खिलारे वय.२० २) प्रथमेश मुकुंद शिंदे वय १९ दोघे रा. लेंगरे ता. खानापूर जि. सांगली असे सांगितले.


त्यांच्याकडे अधिक विचारणा केली असता त्यांनी सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांना विश्वासात घेवुनत्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी दि.२०.०८.२०२२ रोजी सांय ०६.०० वा चे सुमारास दिघंची ते खवासपुर जाणारे रोडवरती रोडने चालत जाणाऱ्या महीलेचे गळयातील दिड तोळयाचे सोन्याचे मंगळसुत्र हिसडा मारुन जबरदस्तीने चोरुन मोटारसायकलवरुन पळुन गेलेबाबतची कबुली दिली असुन त्याबाबत आटपाडी पो ठाणेस गुन्हा रजि. नं ३०५/२०२२ भादंवि कलम ३९२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.


तसेच सदर आरोपीत यांचेकडे अधिक चौकशी केली असता वरील आरोपीत यांनी दि.२०.०३.२०२२ रोजी सकाळी ०८.४५ वा च्या सुमारास घरनिकी गावच्या हददीत ओढयाकडेला मोटारसायकलवरुन एक ७० वर्षीय वृध्द जात असताना त्यास थांबवून म्हणुन त्याच्या गाडीची चावी काढुन घेवुन त्याच्या गळ्यातील चार तोळे वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसडा मारुन जबरदस्तीने तोडुन घेवुन मोटारसायकलवरुन पळुन गेले होते. त्याबाबत आटपाडी पोलीस ठाणेस गुन्हा रजि. नं १०३/२०२२ भादंविसं क ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.


तसेच यातील आरोपीत मजकुर क्रं २ प्रथमेश मुकुंद शिंदे वय १९ रा लेंगरे ता. खानापुर जि. सांगली याचेवरती कुडाळ पोलीस ठाणे जि. सिंधुदुर्ग येथे गुन्हा रजि. नं १०६/२०२२ भादंवि कलम ३९५,३२७,४१७ प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयात तो परागंदा आरोपी आहे. तरी वरील दोन्ही गुन्हयातील चोरीस गेलेले १४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र व ४० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन तसेच आरोपींनी गुन्हा करताना वापरलेल्या दोन मोटासायकली असा एकुण ३,५०,०००/-रु चा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे. 


वरील दोन्ही आरोपींना अटक करुन मा. न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने त्यांना ०५ दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधिक्षक मनीषा दुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, पोहेकॉ कोरवी, पोहेकॉ पाटील, पोहेकॉ पाटील, पोना अमोल कराळे, पोना नितीन मोरे, पोकॉ सोनवणे, पोकॉ ढाले, पोकॉ लोंढे यांनी तपास केला.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies