Type Here to Get Search Results !

विटा शहरात आयकर विभागाची पथके दाखल : आटपाडी, कडेगाव, तासगाव तालुक्यातील बड्या उद्योजकासह राजकारण्यांचे धाबे दणाणले



विटा : खानापुर तालुक्यातील प्रमुख शहर असलेल्या विटा येथे आयकर विभागाची पथके दाखल झाली असल्याने विटा शहरातील व्यापारी, राजकारणी तसेच गलाई व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.


विटा शहरातील मायणी रस्त्यावरील एका मोठ्या हॉटेलमध्ये आयकर विभागाचे अधिकारी बोलेरो, क्रेटा आणि इनोव्हा गाड्या मधून दाखल झाले आहेत. हे सर्व आयकर विभागाचे मोठे अधिकारी आणि कर्मचारी असल्याची माहिती आहे. 


मागील महिन्यात आयकर विभागाने खानापुर तालुक्यातील काही गलाई व्यवसायिक यांच्यावर मुंबई येथे धाड टाकली होती. यानंतर आता थेट विटा शहरातच आयकर विभागाची पथके दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान ही पथके विटा शहर, खानापूर तालुक्यासह आटपाडी, खटाव, तासगाव, कडेगाव तालुक्यातही जाणार असल्याची माहिती मिळत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies