Type Here to Get Search Results !

सांगली : लाच लुचपतच्या सापळ्याची माहिती होताच सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचा शाखा अभियंता फरार : पोलिसात गुन्हा दाखल

 


सांगली : तक्रारदाराच्या प्लॉट वर बांधकाम परवाना संदर्भातील फाईल्स मंजूर करून घेण्यसाठी लाच मागणी करून ती घेणार असतानाच, लाच लुचपतच्या सापळ्याची माहिती होताच सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचा शाखा अभियंता फरार झाला आहे. परंतु त्याच्यावर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचा लोकसेवक अल्ताफ मकबूल मकानदार, वय ४४ वर्षे, शाखा अभियंता, नगर रचना विभाग, सांगली यांने तक्रारदार यांचे दोन प्लॉटचे एकत्रीकरण व त्या प्लॉट वर बांधकाम परवाना संदर्भातील कामासंदर्भातील दोन्ही फाईल्स बांधकाम विभाग महानगरपालिका कार्यालय कुपवाड येथे जमा केल्या आहेत. 


सदरचे काम पुर्ण करून देण्यासाठी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सांगली कार्यालय कुपवाड येथील शाखा अभियंता मकानदार यांनी तक्रारदार यांचेकडे ४५,०००/- रूपये लाचेची मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी दि.१०.११.२०२१ रोजी लाचलुचपत विभागास दिला होता.


तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि. १०.११.२०२१ रोजी ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी कारवाईमध्ये तक्रारदार काम करीत असले कंपनीकडून महानगरपालिका कार्यालय कुपवाड येथे दिलेल्या बांधकाम परवान्याचे काम करून देण्यासाठी लोकसेवक मकानदार यांनी तक्रारदार यांचेकडे ४५०००/- रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. 


त्यानंतर दि.१०.०२.२०२२ रोजी ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे लोकसेवक मकानदार शाख अभियंता यांची पुन्हा पडताळणी केली असता त्यामध्ये लोकसेवक मकानदार यांनी तक्रारदार यांचेशी नवीन कामासंदर्भात चर्चा करून जुने काम करून दिल्याबाबत प्रथम ४०,०००/- रूपये व चर्चे अंती ३०,००० /- रूपये लाच मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले आहे.


लोकसेवक मकानदार यांना तक्रारदार यांचेवर शंका आल्याने त्यांनी तक्रारदार यांचेकडून लाच स्विकारली नाही. लोकसेवक अल्ताफ मकबूल मकानदार, वय ४४ वर्षे, शाखा अभियंता, नगर रचना विभाग, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका कार्यालय कुपवाड रा. अल्फोन्सा स्कूल जवळ, मिरज ता. मिरज जि. सांगली यांचे विरुध्द एम. आय.डी.सी. कुपवाड पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमा प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.


सदरची कारवाई राजेश बनसोडे पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे,  सुरज गुरव, अपर पोलीस उप आयुक्त/अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, यांचे मार्गदर्शनाखाली सुजय घाटगे पोलीस उप अधीक्षक, गुरूदत्त मोरे तत्कालीन पोलीस निरीक्षक तसेच संजय भिलारे पोलीस निरीक्षक, दत्तात्रय पुजारी पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार अविनाश सागर, संजय संकपाळ, सिमा माने, भास्कर भोरे, प्रितम चौगुले, धनंजय खाडे, राधिका माने, रविंद्र धुमाळ, चालक बाळासाहेब पवार यांनी केली आहे.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies