Type Here to Get Search Results !

मुख्याध्यापाकानेच केला विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार!



बुलढाणा: बुलढाण्यातील नांदुरा तालुक्यातील मुरंबा या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत खुद्द मुख्याध्यापकानेच आपल्या शाळेतील पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला आपल्या केबिनमध्ये बोलावून मला तुझा अभ्यास चेक करायचा आहे.म्हणून जवळ बोलावून नंतर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, मुरुंबा हे छोटस गाव व गावात पाचवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेवर दोन शिक्षक असून एक शिक्षक अकोला येथून ये-जा करतात व दुसरे मुख्याध्यापक देविदास दिघोळे हे शेगाव येथून ये-जा करतात. शिक्षकदिनी दुसरे शिक्षक शाळेवर आले नसल्याच पाहून आरोपी मुख्याध्यापक देविदास दिघोळे याने पाचवीत शिकणाऱ्या एका मुलीला आपल्या केबिनमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार केला. कुणालाही सांगू नको अशी धमकीही दिली.




दरम्यान,   मुलीने आपल्या आईला घटना सांगितल्यावर पालकांनी व गावातील नागरिकांनी पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन गाठून या नराधम मुख्याध्यापकाची तक्रार केली आहे. यावरून पोलिसांनी तात्काळ भा.द. वि.३५४ व बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आरोपी मुख्याध्यापक कालपासून फरार होता आज त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies