Type Here to Get Search Results !

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर!



नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदी दरात चढ-उतार होत आहे. याचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठेवर होत आहेत. बुधवारी 14 सप्टेंबर रोजी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमती घसरल्या आहेत.



मल्टी कमोडिटी एक्सचेंजनुसार, सोन्याचा भाव 0.13 टक्क्यांनी घसरला आहे. सुरुवातीच्या व्यवहारात चांदीमध्येही घसरण दिसून येत असून किंमत 1.20 टक्क्यांनी खाली आली आहे. तसेच, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 64 रुपयांनी घसरून 50,0074 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. बुधवारी सोन्याचा व्यवहार ५०,०६९ रुपयांपासून सुरू झाला. पण, नंतर तो किंचित वाढ होऊन  50,0074 रुपयांवर आला.



याशिवाय,  आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. बुधवारी चांदीचा दर 692 रुपयांनी घसरून 56,799 रुपये प्रति किलो झाला आहे. आज चांदीचा व्यवहार 57,099 रुपयांपासून सुरू झाला. चांदी घसरून 56,799 रुपयांवर व्यवहार करू लागली.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies