Type Here to Get Search Results !

दसरा मेळाव्यात ‘यांचे’ पहिल्यांदा अजित पवार ऐकणार भाषण!



मुंबई: शिवसेनेचा दसरा मेळावा आता काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा एकाच दिवशी होणार असल्याने कुणाच्या मेळाव्याला जायचं? असा पेच निर्माण होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांना तुम्ही कुणाचे भाषण ऐकणार असा प्रश्न विचारण्यात आला. यावर पवारांनी स्पष्ट उत्तर दिले आहे.



विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार हे आज पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. दसरा मेळ्याव्यात शिंदे की ठाकरे कुणाचं भाषण पहिले ऐकणार? असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवार यांना विचारला.



यावर उत्तर देताना पवार म्हणाले, 'उद्धव ठाकरे आणि शिंदे या दोघांची भाषणं एकाचवेळी सुरू झाली तर मी प्रथम उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकेन. त्यानंतर टीव्हीवर रिपीट करण्यात येणारे एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकेन' असे अजित पवारांनी सांगितलं आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies