Type Here to Get Search Results !

सावकारांच्या जाचाला कंटाळून सहकार विभागातील अधिकाऱ्याने केली आत्महत्या!



पुणे: पुण्यात सावकारांच्या जाचाला कंटाळून सहकार विभागातील अधिकाऱ्याने आत्महत्या केली आहे. सहकार विभागाच्या लेखाधिकाऱ्याने मंगळवार पेठेतील बालाजी हाईट्स या इमारतीमधील राहत्या घरी सोमवारी (19 सप्टेंबर) गळफास घेत आत्महत्या केली आहे. गणेश शंकर शिंदे (वय 52 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. 



माहितीनुसार, मुंबईतून पुण्याला बदली पाहिजे असल्याने अधिकाऱ्यांना पैसे देण्यासाठी गणेश शंकर शिंदे यांनी सावकारांकडून 20 ते 25 टक्के व्याजदराने 84 लाख 50 हजार रुपये कर्ज घेतलं होतं. त्यांनी अधिकाऱ्यांना पैसे दिले, त्यानंतर त्यांची बदली देखील झाली. परंतु सावकारांचं दिलेल्या कर्जाचे काही हफ्ते गणेश शिंदे यांनी थकवले. सावकाराचं कर्ज फेडण्यासाठी त्यांनी बँकेतून लोन घेण्याचीही तयारी केली होती. परंतु लोन करुन देणाऱ्या व्यक्तीने पैसे घेऊन ऐनवेळी लोन मंजूर करण्यास नकार दिला. यामुळे सावरकारांनी पैशांसाठी लावलेला तगादा आणि फसवणूक यामुळे कंटाळलेल्या सहकार विभागाचे लेखाधिकारी गणेश शिंदे यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. सोमवारी त्यांनी राहत्या घरी गळफास घेतला.तसेच, गणेश शिंदे यांनी सुसाईड नोटही लिहिलेली आहे, ज्यात सावकारांनी पैशांसाठी तगादा लावल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.



दरम्यान, गणेश शिंदे यांच्या पत्नी शोभना यांनी दिलेल्या तक्रारीनंतर फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये सात जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शंकर लक्ष्मण गायकवाड, विजय सोनी आणि त्यांचे वडील, बाळकृष्ण क्षीरसागर, गणेश साळुंखे, मनीष हाजरा, पंधरकर अशी गुन्हा नोंदवलेल्या आरोपींची नावं आहेत. त्यापैकी विजय सोनी, बाळकृष्ण क्षीरसागर, गणेश साळुंखे आणि मनीष हाजरा यांना अटक करण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies