Type Here to Get Search Results !

बहिणीला नांदवत का नाही म्हणून विचारले असता भावोजीने मेव्हण्यालाच....!



कराड : कराड तालुक्यातील उंडाळे गावातील माळी वस्ती येथे काल रात्री बहिणीला नांदवत नसल्याच्या कारणावरून वाद झाला आणि भावोजीने थेट रागाच्या भारत मेहुण्याचा खून केला. सचिन वसंत मंडले असे हत्या झालेल्या 35 वर्षीय मेहुण्याचे नाव आहे.तर अवधूत हणमंत मदने असे 42 वर्षीय आरोपीचे नाव आहे.


याबद्दल अधिक माहिती अशी कि, अनंत चतुर्दशीच्या रात्री सर्वत्र गणपती विसर्जनाचा उत्साह होता. याचदरम्यान उंडाळे गावातील माळी वस्ती येथे आरोपी भावोजी व त्याच्या मेहुण्यामध्ये बहिणीला का नांदवत नाही म्हणून भांडण झाले. संतापलेल्या भावोजीने धारदार शस्त्राचा वापर करून मेहुण्याचा खून केला. रात्री 10 ते 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 



दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच कराड तालुका पोलीस तातडीने घटनास्थळास्थळी दाखल झाले. त्यांनी फरार आरोपीला अवघ्या अडीच तासांत शोधून ताब्यात घेतले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies