मुंबई : आगामी निवडणुकीत एकही नेता शिवसेनेत नसेल, सगळे शिंदेगटात येतील, असे बावनकुळे म्हणाले होते. त्याला किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
पेडणेकर म्हणाल्या, “नुसतं बावनकुळे आडनाव असून चालत नाही, डोक्यात पण काहीतरी असावं लागतं”, अश्या कठोर शब्दात पेडणेकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली आहे.
तसेच, शिंदेगट आणि शिवसैनिकांमध्ये झालेल्या वादा प्रकरणी न्याय मागण्यासाठी पोलिसांकडे जाणार असल्याचे पेडणेकर म्हणाल्या आहेत.