Type Here to Get Search Results !

आजचे दिनविशेष: इतिहासातील महत्वाच्या घटना!



आटपाडी:  आज 14 सप्टेंबर आहे याच दिवशी 1949 रोजी हिंदीला अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत ते या दिनविशेष च्या माध्यमातून जाणून घेऊयात.


1901 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅकेन्झी यांची गोळ्या झाडून हत्या  

1917 : रशियाला अधिकृतपणे प्रजासत्ताक देश म्हणून घोषित केले 

1949 : संविधान सभेने हिंदीला भारताच्या अधिकृत भाषेचा दर्जा दिला 

जगात सर्वाधिक बोलल्या आणि समजल्या जाणाऱ्या भाषांपैकी हिंदी ही एक भाषा आहे. महात्मा गांधी म्हणाले होते की, हिंदी ही लोकांची भाषा आहे. महात्मा गांधी यांनी हिंदे भाषेला देशाची राष्ट्रभाषा बनवण्याची शिफारसही केली होती. 14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदीला अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. संविधान सभेने देवनागरी लिपीत हिंदीसह इंग्रजी ही अधिकृत भाषा म्हणून स्वीकारली. परंतु, 14 सप्टेंबर 1949 रोजी संविधान सभेने हिंदीला भारताची अधिकृत भाषा म्हणून घोषित केले. त्यामुळे पहिला हिंदी दिवस 14 सप्टेंबर 1953 रोजी साजरा करण्यात आला. तेथून पुढे दर या दिवशी संपूर्ण भारत भरत हिंदी दिवस साजरा केला जातो. 

1959 : सोव्हिएत युनियनचे अंतराळयान प्रथमच चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले.

1960 : खनिज तेल उत्पादक देशांनी मिळून ओपेकची स्थापना केली.


2000 : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी अमेरिकन सिनेटच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित केले 


2008 :रशियातील पर्म विमानतळावर एरोफ्लॉट विमान कोसळले. विमानातील सर्व 88 जणांचा मृत्यू झाला.

2009 : भारताने श्रीलंकेचा 46 धावांनी पराभव करत तिरंगी मालिकेतील कॉम्पॅक कप जिंकला

2009 : भारताच्या लिएंडर पेस आणिचेक गणराज्यच्या लुकास लोही यांनी महेश भूपती आणि मार्क नोल्स या जोडीचा पराभव केला. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies