Type Here to Get Search Results !

मनी लाँड्रिंग चौकशीदरम्यान जॅकलिन-पिंकीमध्ये अधिकाऱ्यांसमोर दोन तास शाब्दिक बाचाबाची!



मुंबई: अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला काल म्हणजेच 14 सप्टेंबर रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात EOW  कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. या चौकशीत सुकेश चंद्रशेखरची सहकारी पिंकी इराणीलाही पोलिसांसमोर हजर करण्यात आले. सुकेश चंद्रशेखरप्रकरणी या दोघींना समोरासमोर बसवून त्यांची चौकशी करण्यात आली. पिंकी इराणीच्या माध्यमातून जॅकलिन आणि सुकेश यांचा संपर्क झाला होता. बुधवारी झालेल्या सुमारे आठ तासांच्या या चौकशीदरम्यान जॅकलिन आणि पिंकी यांच्यात अधिकाऱ्यांसमोर शाब्दिक बाचाबाची झाल्याचे समोर येत आहे.



आर्थिक गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा जॅकलिन आणि पिंकीची समोरासमोर चौकशी केली जात होती, तेव्हा ते जवळपास दोन तास वाद घालत होते. या दोघींनी एकमेकींवर आरोपदेखील केले. चौकशीदरम्यान दोघींनी एकमेकींना शिवीगाळही केली. अखेर त्यानंतर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. आठ तासांनंतर ही चौकशी संपली. आता गरज पडल्यास जॅकलिनला ईओडब्ल्यूकडून चौकशीसाठी बोलावण्यात येईल. या दोघींनाही पुढील चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते.



दरम्यान, जॅकलिन आणि पिंकीच्या आधी अभिनेत्री नोरा फतेहीलही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात समन्स बजावण्यात आले होते. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies