Type Here to Get Search Results !

'या' सवयींमुळे अनेकांकडून पैशांची बचत होत नाही! जाणून घ्या...!आटपाडी: अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या महत्त्वाच्या गरजा आहेत. मात्र, सध्याच्या लाइफस्टाइलच्या गरजांमुळे खर्च वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आवश्यक खर्च आणि अनावश्यक खर्च यातला फरक लक्षात न आल्यामुळे अनेकांकडून पैशांची बचत होत नाही.एका अभ्यासानुसार, बहुतांशी जण आपल्या पगारातील 10 ते 20 टक्के हिस्सा हा अनावश्यक बाबींमध्ये खर्च करतात. एखाद्या व्यक्तीला 50 हजार रुपये पगार असेल तर ती व्यक्ती किमान पाच हजार रुपये अनावश्यक खर्च करते. आर्थिक शिस्त पाळल्यास काही प्रमाणात तुमची बचत होऊ शकते. 


पर्यटन, भटकंती: अनेकजण देश-विदेशात फिरण्यासाठी जातात. वर्षातून किमान दोन वेळेस पर्यटनास जाणे ही बाब समजू शकतो. मात्र, अनेकजण दर महिन्याला बाहेर फिरण्यासाठी जातात. अशामुळे तुमचा महिन्याचा खर्च वाढतो. आनंदासाठी पर्यटन करणे आवश्यक आहे. मात्र, ज्या पर्यटनांमुळे आपल्यावर आर्थिक भार येता कामा नये याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. दारू आणि सिगारेट: मद्य आणि सिगारेट सेवनाचे व्यसन असेल तर सावध व्हा. या सवयी आरोग्यासाठी घातक आहेतच शिवाय अधिक खर्चिकदेखील आहे. काहीजणांची पार्टी दारू-सिगारेटशिवाय पूर्ण होत नाही. सिगारेट-दारूच्या व्यसनासाठी अनेकजण हजारो रुपये खर्च करतात. 


शॉपिंग: जेव्हा तुम्ही खरेदी करण्यासाठी जाता तेव्हा अधिक खरेदी होते.  शॉपिंगला जाण्याआधी तुम्ही खरेदी करणाऱ्या वस्तूंची यादी तयार करा. ऑफरला भुलून इतर खर्च करू नका. त्याशिवाय सर्वात महागडी आणि सर्वात स्वस्त वस्तू खरेदी करण्याची सवय बदलावी लागेल. अनेकजण ब्रॅण्डच्या नादात खूप खर्च करतात. महागड्या, ब्रॅण्डेड वस्तूंची खरेदी करणे हे आपल्या 'स्टेट्स'साठी आवश्यक असल्याचा गैरसमज अनेकांचा असतो. 


आवश्यक नसलेल्या वस्तूंची खरेदी: अनेकजण आवश्यकता नसतानाही अनेक वस्तू खरेदी करतात. विशेषत: गॅजेट्स खरेदी करतात. मात्र, त्याचा वापर फार कमी वेळेस केला जातो. अनावश्क वस्तूंची खरेदी ही सेल, ऑफर आणि क्रेडिट कार्डच्या वारेमाप खर्चातून होत असते. या खर्चावर लगाम लावल्यास तुमचा आर्थिक खर्च वाचेल. 


रेस्टोरंट्स, ऑनलाइन फूड ऑर्डर: मोठ्या शहरांमध्ये रेस्टोरंट्समध्ये जाणे किंवा ऑनलाइन फूड ऑर्डर करण्याचे प्रमाण वाढले आहे. कधीतरी बाहेरून पदार्थ ऑर्डर करणे ही समजण्यासारखी बाब आहे. मात्र, अनेकजण अनावश्यकपणे ऑनलाइन फूड ऑर्डर करतात अथवा रेस्टोरंट्समध्ये जातात. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies