Type Here to Get Search Results !

९ वर्षीय मुलीवर सलग दोन वर्षे आजोबांसह तिघांकडून लैंगिक अत्याचार!



मुंबई: भांडुपमध्ये आई, आजी कामावर गेल्यानंतर ज्यांच्याकडे सांभाळण्यासाठी ठेवले त्यांचीच वाईट नजर चिमुकलीवर पडली आणि गेल्या दोन वर्षांपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरु असल्याची घटना समोर आली आहे. 'मी आजोबा म्हणून हाक मारायचे, पण तेच अत्याचार करत होते.' आईलाही सांगितले असल्याचे सांगताना मुलीला अश्रू अनावर होत आहे. या घटनेने तिला मानसिक धक्का बसला असून पोलिसांकडून तिचे समुपदेशन सुरु आहे. भांडुप पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, नाहूर परिसरात ९ वर्षीय नेहा आई आणि आजीसोबत राहायची. दोघीही कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर दिवा येथे राहणारा आरोपी आप्पा उर्फ अशोक एकनाथ वारुंगसे (६२), भांडुपमधील दिनेश रामजी ठक्कर (६५) यांच्याकडे सांभाळण्यासाठी देत होते. तिच्या एकटेपणाचा फायदा घेत आरोपींनी तिच्यावर अत्याचार सुरु केले. काही दिवसांपूर्वी नेहा आजीसोबत पैसे मागताना दिसून आली. एका समाजसेवी संस्थेच्या सदस्यांची नेहाच्या हिरमुसलेल्या चेहऱ्याकडे लक्ष गेले. त्यांनी नेहाला ताब्यात घेत मानखुर्दच्या बालगृहात ठेवले. तेथील अधिकाऱ्यांनी तिला विश्वासात घेत चौकशी करताच तिच्यावर सुरु असलेल्या क्रूरतेला वाचा फुटली.



दरम्यान, २०२० पासून २० जून पर्यंत तिच्यावर अत्याचार सुरु होते. याबाबत तिने आईलाही सांगितले होते मात्र आईनेही तिच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी दुर्लक्ष केले. त्यामुळे नेहावर तीन विकृतांकडून अत्याचार सुरु होते. ही बाब समोर येताच छाया मलैया मुथा (४४) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पोक्सो, लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा नोंदवत दोघांना अटक केली. तर तिसऱ्या अनोळखी व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहे. (सौ. लोकमत)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies