Type Here to Get Search Results !

“...तर पोलिसांना सोडणार नाही”, शिंदे-फडणवीस सरकारला ‘यांचा’ इशारा!



जालना : विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर अंबादास दानवे यांची वर्णी लागल्यानंतर त्यांच्याकडून शिंदे गटावर सडकून टीका केली जात आहे. शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केले, तर पोलिसांना सोडणार नाही, अशी धमकी दानवे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिली आहे.



तसेच, विरोधक अंगावर आले तर त्यांचा यथोचित पाहुणचार करण्यात येईल, असा इशारा दानवे यांनी शिंदे गटाला दिला आहे. आदील शाहा,कुतुब शाहाला परत पाठवलं, तुम्हालाही पाठवू, असा इशारा दानवे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही दिला. 



दरम्यान, बुलडाण्यात शिवसेनेच्या एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शिंदे गटातील काही कार्यकर्ते या कार्यक्रम सुरु असताना घोषणाबाजी करत होते. त्यावेळी अंबादास दानवे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies