Type Here to Get Search Results !

“.....त्यांच्यावर कारवाई होईल” याकूब मेमन प्रकरणावर एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया!



मुंबई : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याच्या कबरीचा मुद्दा सध्या जोरदार तापला आहे. याकूब मेमन याची कबर फुलांनी सजवण्यात आल्याचा एक फोटो व्हायरल झाला होता. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर भाजपाने शिवसेनेवर टीका केली आहे. अशातच आता अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याकूब मेमन प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 



याकूब मेमन प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रतिक्रिया देत म्हणाले,  “सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. जे चुकीचे आहे त्यांच्यावर कारवाई होईल” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.



दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फडणवीसांच्या निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies