Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, शनिवार १० सप्टेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!मेष

फिरायला जाण्याची संधि मिळेल. आपल्या तत्ववादी स्वभावाला मुराद घालावी लागेल. नवीन ओळख होईल. नवीन वाचन वा लिखाण चालू करावे. कुटुंबासोबत दिवस चांगला जाईल. वृषभ:

सामाजिक कामात सहभागी होता येईल. खाण्या-पिण्याची रेलचेल होईल. व्यापार्यांसनी आळस दूर सारावा. केवळ कामावर लक्ष केंद्रीत करावे. घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घ्या.मिथुन:

जमिनीतील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. मित्रांशी सलोख्याने वागावे. आर्थिक बाजू संतुलित ठेवावी. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. निराशाजनक विचार करू नका. कर्क:

भेटवस्तू मिळण्याची शक्यता. बौद्धिक कौशल्य दाखवा. घरातून काम करण्याची संधी चालून येऊ शकते. नवीन प्रस्तावांकडे लक्ष ठेवावे. गरज नसताना आक्रमक होऊ नका.सिंह:

आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. उत्साहाने कार्यरत राहावे. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. मुलांचे प्रेम वाढेल.कन्या:

पुढील परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा. घरातील लोकांशी सल्लामसलत करावी. सहकार्यांनचे उत्तम सहकार्य लाभेल. रचनात्मक कामे करावीत. बोलण्यातून लोकसंग्रह वाढवाल.तूळ:

तुमच्या भोवती संशयाचे जाळे निर्माण होऊ शकते. छोटे प्रवास घडतील. वैयक्तिक समस्या सोडवता येतील. कौटुंबिक जबाबदारी पूर्ण कराल. जुनी कामे पूर्ण करण्याचा ध्यास घ्या.वृश्चिक:

संयमाने परिस्थिती हाताळा. नवीन गोष्टी शिकण्यावर भर द्या. तरूणांशी मैत्री वाढेल. क्षुल्लक मानसिक समस्या जाणवू शकतात. मनाची चलबिचलता जाणवेल.धनू:

टीकेकडे लक्ष देऊ नका. मानसिक शांतता लाभेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मदत करताना ऊर्जा वाया घालवू नका. तुमच्या कलागुणांचे कौतुक होईल.मकर:

दिनक्रम व्यस्त राहील. कामाचा उरक वाढेल. व्यापारी वर्ग खुश राहील. अधिकारी तुमचे कौतुक करतील. व्यापारासाठी योग्य काळ.कुंभ:

मनाचा आवाज ऐकावा. भावनेला आवर घालावी. भावंडांची बाजू समजून घ्यावी. गोष्ट अधिक प्रमाणात ताणू नये. नवीन गोष्टी शिकाल.मीन:

कृतीतून वाद उत्पन्न होऊ देऊ नका. अचानक धनलाभाची शक्यता. योग्य जागी गुंतवणूक कराल. शेअर्स मध्ये लाभ संभवतो. घाईघाईने निर्णय घेऊ नका.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies