Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, बुधवार १४ सप्टेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष: घरात उत्साहाचे वातावरण राहील. आरोग्यात सुधारणा होईल. एखादा नवीन करार होण्याची शक्यता. आवश्यक तेथेच बढाया मारा. भौतिक विकास होईल. 


वृषभ:

कुटुंबासमवेत वेळ चांगला जाईल. कौटुंबिक खर्च वाढेल. घरात मानाची वागणूक मिळेल. मनोकामना पूर्णत्वास जाण्याचे योग. कामातील नवीन योजनांवर भर द्यावा. 


मिथुन:

मानसिक शांतता व समाधान लाभेल.  आपले मानसिक आरोग्य स्वस्थ ठेवा. एखादे काम पूर्ण दिवस घेईल. करमणुकीच्या साधनात जास्त वेळ घालवाल. घरातील ज्येष्ठ मंडळींशी चर्चा कराल. 


कर्क:

हातातील कामात यश येईल.  अति धाडसाने कोणताही निर्णय घेऊ नका. सहकारी संपूर्ण सहकार्य करतील. आपल्या बोलण्यात स्पष्टता ठेवाल. सृजनात्मक कार्यातील आवड वाढेल. 


सिंह:

वरिष्ठ अधिकाऱ्याशी जुळवून घ्यावे लागेल. मुलांबरोबर वेळ आनंदात जाईल. दिनक्रम व्यस्त राहील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. समोरच्या व्यक्तीच्या मतांचा आदर करावा.



कन्या:

प्रेमातील व्यक्तींना नवीन उत्साह लाभेल. कामातील नवीन संधी शोधाव्यात. व्यावहारिक सावधानता बाळगावी. वाणी संयमित असावी. अनाठायी खर्चाला बळी पडू नका.


तूळ:

एखादा जुना वाद संपुष्टात येईल. जोडीदाराशी अति वाद टाळावा. आजचा दिवस लाभदायक. नवीन प्रकल्प हाती घेऊ शकता. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल.


वृश्चिक:

नोकरदार वर्गाला दिलासादायक बातमी मिळेल. अति तिखट पदार्थ टाळा. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. तुमची मते इतरांना मान्य होतील.


धनू:

नवीन संधी हेरता आली पाहिजे. तुमचा सल्ला लोक ऐकतील. कामात जोखीम पत्करावी लागेल. नेहमीच्या कामात काहीसा बदल करून पाहावा. गूढ गोष्टींचे वाचन कराल.


मकर:

धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. अति जड पदार्थ खाऊ नयेत. एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. विनाकारण पैसे खर्च होतील. घरातील कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. 


कुंभ:

कामे उरकण्याची घाई कराल. जोडीदाराचे मत शांतपणे ऐकावे. संमिश्र घटनांचा दिवस. आहारावर नियंत्रण ठेवावे. विद्यार्थांच्या इच्छा पूर्ण होतील.


मीन:

सामाजिक स्तरावर मान वाढेल. घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. संयमाने समोरील समस्येचे निराकरण करू शकाल. जुने परिचित लोक भेटतील. व्यापारी वर्गाला सुखकारक दिवस. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies