Type Here to Get Search Results !

शिंदे गटाच्या समर्थकाने लग्नाचे आमिष दाखवत विवाहितेवर केला अत्याचार!



औरंगाबाद: औरंगाबादमध्ये  एका विवाहीत महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून तब्बल २ कोटी रुपये उकळण्यात आले आहेत. त्यानंतर आरोपीने महिलेला ब्लॅकमेलही केले, तिच्यासोबत संबंध प्रस्थापित केले. पीडिता गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपात केला आणि नंतर जीवे मारण्याची धमकी दिली.या  प्रकरणी आरोपी शिंदे गट समर्थक ज्योतीराम विठ्ठल धोंगडे-पाटील यांच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, युवासेनेचा पदाधिकारी राहिलेला आणि आता शिंदे गटामध्ये सामील झालेला कट्टर शिंदे गट समर्थक ज्योतीराम विठ्ठल धोंगडे-पाटील याने एका विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला आहे. त्यानंतर त्याने पीडितेकडून जवळपास दोन कोटी रुपये उकळले आहेत. त्यासोबतच पीडिता गर्भवती राहताच तिचा गर्भपात करुन नंतर बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी दिली या आरोपावरून औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



दरम्यान, पीडितेच्या तक्रारीवरुन मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies