Type Here to Get Search Results !

कोर्टाच्या निकालानंतर 'या' मैदानात होणार मुख्यमंत्र्यांचा दसरा मेळावा!



मुंबई:  शिवसेनेच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे होणार आहेत. एक दसरा मेळावा हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाचा आणि दुसरा दसरा मेळावा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा होणार आहे. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी केली आहे. उद्धव ठाकरे  गटाने शिवाजी पार्क तर एकनाथ शिंदे गटाने बीकेसीमधील एमएमआरडीए मैदानात दसरा मेळाव्यासाठी तयारी केली आहे.



दरम्यान,  बीकेसीमधील एमएमआरडीए मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दसरा मेळाव्याची परवानगी मिळाली होती. त्याच मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बीकेसीमधील एमएमआरडीए मैदानात मैदानात मोठी तयारी सुरू केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies