मुंबई: आज शिक्षक दिन सर्वत्र साजरा केला जात आहे. यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शिक्षकांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हे तुमचे आमचे सर्वच सरकार आहे. शिक्षणासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. शाळांना पायाभूत सुविधा देण्यासाठी निधींची कमतरता पडू देणार नाही. शिक्षकांनी ज्या काही सूचना केल्या त्याबद्दल सकारात्मक विचार केला जाईल. तसेच शिक्षकांचे पगार वेळेवर झाले पाहिजे त्यासाठी शिक्षण विभागाला आदेश देणार असल्याचे देखील मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
दरम्यान, या कार्यक्रमाला शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.