Type Here to Get Search Results !

स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत पदवीधरांना मिळणार नोकरी: ६० हजारपेक्षा जास्त पगार!नवी दिल्ली:  स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पीओच्या एकूण १६७३ जागांवर भरती केली जाणार आहे. या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया या ऑनलाइन पध्दतीने आयोजित करण्यात आली आहे. यासाठी, उमेदवार एसबीआयची अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. ही प्रक्रिया आज  २२ सप्टेंबरपासून सुरु झाली असून इच्छुक उमेदवार या पदांसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत या पदासाठी अर्ज करु शकतात.अर्ज करण्यासाठी, अधिकृत वेबसाइट sbi.co.in ला भेट द्या

वेबसाइटच्या होम पेजवर Whats New च्या लिंकवर क्लिक करा.

स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय प्रोबेशनरी ऑफिसर्स ऑनलाइन फॉर्म २०२२ फॉर १६७३ पोस्ट या लिंकवर जा. आता क्लिक हिअरवर अप्लाय करा.

पुढील अर्जाची प्रक्रिया करुन अर्ज भरु शकतात.दरम्यान, या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर असणे आवश्यक आहे. या पात्रतेला अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय २१ वर्ष व ३० वर्षांपेक्षा कमी हे निश्चित करण्यात आले आहे. तसेच या जागेसाठी उमेदवाराला ६३,८४० रुपये पगार देण्यात येईल.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies