Type Here to Get Search Results !

‘यामुळे’ आधार कार्डला मतदान कार्ड लिंक करणे गरजेचे आहे: जाणून घ्या अधिक माहिती...!

 


नवी दिल्ली: मतदान कार्ड आधार कार्डला लिंक करण्याचे काम सध्या सुरू आहे. आतापर्यंत 46 कोटी लोकांनी आपलं व्होटर आयडी कार्ड आधारशी लिंक केलं आहे. निवडणुकीशी संबंधित कायद्यात बदल करण्यात आल्याने ही प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली आहे. अनेक लोक बोगस मतदान करतात. मतदार यादीत बोगस मतदारांची नावे असतात. ही नावे काही लाखांच्या घरात आहेत. त्यामुळे ही बोगसगिरी रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने व्होटर आयडीला आधारशी लिंक करण्याचा मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.



प्रत्येक मतदाराला आपल्या मतदान कार्डाला आधार कार्डशी लिंक करणं बंधनकारक असल्याचे कायद्यात स्पष्टपणे म्हटले आहे. मात्र, कुणाकडे आधार कार्ड नसेल तर त्याला मतदानापासून वंचित ठेवले जाणार नाही, असेही या कायद्यात म्हटले आहे. तसेच, जर एखाद्याचं आधार कार्ड व्होटर आयडीशी लिंक नसेल तर मतदान करण्यासाठी त्या व्यक्तिला रोजगार हमी योजनेचं जॉब कार्ड, बँक पासबूक, हेल्थ विमा कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन डॉक्यूमेंट, सर्व्हिस आयडी कार्ड, ऑफिशियल आयडी कार्ड आणि सामाजिक न्याय मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेले युनिक आयडेंटिटी कार्ड द्यावे लागणार आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies