Type Here to Get Search Results !

संजय राऊतांच्या जामीन अर्जावर ईडीला उत्तर देण्याचे निर्देश; त्यानंतरच होणार सुनावणी!



मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांना मुंबईतल्या पत्राचाळ मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. अशातच संजय राऊतांनी जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयाच्या  विशेष पीएमएलए कोर्टात अर्ज दाखल केला होता. या पार्श्वभूमीवर संजय राऊतांच्या जामीन अर्जावर ईडीला उत्तर देण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत. 



मनी लॉंड्रिंग प्रकरणात ईडीच्या कोठडीत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात अर्ज दाखल केला आहे. यावर आज सुनावणी होण्याची शक्यता होती. पण आता संजय राऊतांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार नाही. मुंबई सत्र न्यायालयानं ईडीला संजय राऊतांच्या जामीन अर्जावर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. 



दरम्यान संजय राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयाने 19 सप्टेंबरपर्यंत संजय राऊतांना न्यायालयीनं कोठडी सुनावली आहे. तर ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी न्यायालयानं 16 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. तसेच, याच दिवशी राऊतांच्या जामीन अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies