मुंबई : दसरा मेळाव्याआधीच राज्यातील राजकारण तापायला सुरुवात झाली. अशातच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “लोकशाही जपणं आपलं कर्तव्य आहे. मात्र गद्दारांना धडा शिकवला पाहिजे. फक्त हातात भगवा नको,तर हृदयात भगवा हवा असे उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केले.
तसेच, माझ्यासोबत जुनी माणस आहेत, त्यात नवी माणसं जोडली जात आहेत. या मतदारसंघात शिवनेरी आहे. त्या मतदारसंघात गद्दार माणसे आढळली नाही पाहिजेत, याशिवाय, मध्यंतरी, हिंदुत्वाचा तोतयागिरी करणाऱ्यांनी कळस गाठला. इतिहासात हे तोतयांचे बंड म्हणून ओळखले जाईल, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केले.