Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, गुरुवार ८ सप्टेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:

भावंडांशी नाते दृढ होईल. शांत पद्धतीने केलेली कामे यश देतील. गरजूंना मदत कराल. चांगल्या कामासाठी पैसे खर्च होतील. व्यवसायात स्वत:च अस्तित्व निर्माण कराल.



वृषभ:

अनपेक्षित लाभ होतील. कामात क्षुल्लक समस्या येऊ शकतात. कर्ज व्यवहार टाळावेत. व्यवसाय विस्ताराचा विचार कराल. तुमच्यावर शंका घेतली जाईल असे वागू नका.



मिथुन:

हित शत्रूंच्या कारवाया वाढतील. जुन्या प्रश्नांची उकल होईल. जोडीदार तुमच्यावर खुश होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. अचानक लाभाची शक्यता.



कर्क:

प्रेमसंबंध मानसिक शांतता प्रदान करतील. समोरच्याचे वर्चस्व राहील. वरिष्ठ अधिकार्यांयचा पाठिंबा मिळेल. ज्येष्ठ अधिकार्यांेची गाठ पडेल. घरात चांगले कार्य घडेल.



सिंह:

आत्मविश्वास वाढीस लागेल. सर्वांशी सामंजस्याने वागाल. झालेल्या लाभाची वाच्छता करू नये. भागीदारीत काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत. आपले स्पर्धक त्रास देऊ शकतात. 



कन्या:

दिवसाचा उत्तरार्ध मित्रांसोबत घालवाल. तब्येतीची काळजी घ्या. जुनी समस्या संपुष्टात येईल. प्रलंबित कामे यशस्वीरित्या मार्गी लागतील. घरातील कामात आनंद मिळेल.



तूळ:

कामावर अधिक लक्ष केंद्रीत करावे. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. कार्यक्षेत्रात जोखीम पत्करताना सावधानता बाळगा. कर्जाचे व्यवहार टाळावेत. अपेक्षित उत्तराची प्रतीक्षा संपेल.



वृश्चिक:

नियोजन व कौशल्य पणाला लागू शकते. व्यवसायात पुढारीपणा दाखवाल. कामाच्या ठिकाणी वादात पडू नका. गोड बोलून कामे करून घ्याल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. 



धनू:

पालकांच्या सल्ल्यानेच कामे करावीत.  घरातील वातावरण आनंददायी असेल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. मोठ्या वस्तूंची खरेदी होईल. अधिकारी वर्गाकडून पूर्ण सहयोग मिळेल. 



मकर:

समोरच्यावर एकदम विश्वास ठेऊ नका. मानसिक तणाव निवळतील. लाभ पदरात पडून घ्यायला धावपळ होईल. काही सकारात्मक वार्ता मिळतील. विद्यार्थ्यांनी चिकाटी सोडू नये.



कुंभ:

संसर्गजन्य विकारांपासून काळजी घ्या. एकाच वेळी अनेक कामे सामोरी येतील. जुनी कामे मार्गी लागतील. प्रवास जपून करावा. संभ्रमात कोणतेही काम करू नका.




मीन:

विवाह इच्छुकांना पुढील बोलणीसाठी अनुकूल दिवस. खाण्यावर नियंत्रण ठेवा. व्यावसायिक विस्तारासाठी अनुकूल काळ. कौटुंबिक जबाबदार्यार उत्तमरीत्या पार पाडाल. नवीन अधिकार हातात येतील.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies