Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, शुक्रवार २ सप्टेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:

मेहनत फळाला येईल. विनाकारण आक्रमकता दाखवू नका. कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा पूर्ण  कराल. नवीन लिखाण वाचनाचे काम चालू करा. तुमच्यातील क्रियाशीलता वाढीस लागेल. 


वृषभ:

व्यावसायिक निर्णय फलद्रुप होताना दिसतील. बोलण्यात गोडवा ठेवाल. कुटुंबासाठी वेगळा वेळ काढावा. घरगुती जबाबदारी वाढू शकते. घरातील मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. 


मिथुन:

भाग्याची चांगली साथ मिळेल. घरात आनंदी वातावरण असेल. बौद्धिक बाजू चमकेल. हातातील अधिकार ठामपणे बजावा. दिवस मनाप्रमाणे घालवाल.


कर्क:

आळस दूर सारावा. दिवसाची सुरुवात छान होईल. नवीन ओळखी मन प्रफुल्लित करतील. जोडीदाराच्या सल्ल्यावर विचार करावा. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. 


सिंह:

व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल. आपले स्वत्व राखून वागाल. वेळेचा सदुपयोग करा.मुलांबरोबर चांगला वेळ जाईल. नोकरदार वर्गाला दिवस चांगला जाईल. 


कन्या:

प्रलंबित येणी प्राप्त होण्याचे संकेत. बोलण्याने लोकसंग्रह जमवाल. झोपेची काहीशी तक्रार जाणवेल. घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. मानसिक तणाव वाढू शकतो. 


तूळ:

घरातील ज्येष्ठांची संवादात्मक चर्चा करावी. छोटे प्रवास घडतील. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. तुमच्या कौशल्याचे कौतुक केले जाईल. दिवसाची सुरुवात उत्साहात करा. 

 

वृश्चिक:

तुमचे निर्णय योग्य ठरतील. धार्मिक कामासाठी पैसे खर्च कराल. आपल्या मनातील विचार योग्य पद्धतीने बोलून दाखवा. आर्थिक व्यवहार सर्व बाबी तपासून करावेत. बोलतांना शांत व विचारपूर्वक बोला.


धनू: 

जोडीदाराशी मोकळेपणाने चर्चा करा. जुन्या विचारांना थारा देऊ नका. घरातील वातावरण कलुषित होणार नाही याची काळजी घ्या. बोलण्यात गुप्तता पाळावी. आक्रमक किंवा कटू शब्द टाळा. 


मकर:

जुने वाद मिटण्याची शक्यता. तुमचे मनोधैर्य उंचावेल. अधिकार्यांाकडून उत्तम सहकार्य लाभेल. दिवसाचा उत्तरार्ध मजेत घालवाल. कामातून समाधान लाभेल.


कुंभ:

संशोधन पुढे नेण्यास उत्तम काळ. हातातील कामे यशस्वी होतील. जुगारातून धनलाभ संभवतो. रागावर नियंत्रण ठेवावे. उतावीळपणे वागू नका.  


मीन:

जोडीदाराचे व्यावहारिक चातुर्य दिसेल. बोलण्याचा आवेश इतर कामांसाठी वापरा. जुनी गुंतवणूक कामी येईल. लोक तुमचा सल्ला मागतील. घरातील वातावरण खेळकर राहील. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies