मुंबई: आज शिक्षक दिनाच्या निमित्तानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. एकूण 46 शिक्षक यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2022 चे मानकरी ठरले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचाही समावेश आहे. महाराष्ट्रातील कविता संघवी, शशिकांत कुलथे आणि सोमनाथ वाळके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देण्यात आला आहे. यामध्ये दोघे शिक्षक बीड जिल्ह्यातील आणि एक मुंबईतील आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याच्या दामुनाईक तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक शशिकांत कुलथे, बीड जिल्ह्यातील पारगाव जोगेश्वरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे शिक्षक सोमनाथ वाळके आणि मुंबईतील छत्रभूज नरसी मेमोरियल स्कुलच्या मुख्याध्यापक कविता संघवी यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाले आहेत.