मेष :
जुन्या मित्रमंडळींच्या भेटीचा योग. दिवस मनासारखा घालवाल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. इतरांचे गैरसमज दूर करावे लागतील.
वृषभ:
वाहन चालवताना काळजी घ्यावी. मनाची द्विधावस्था टाळावी. दिवसभर कामाची धांदल राहील. एकाच गोष्टीवर ठाम राहावे. मनातील नसती शंका काढून टाकावी.
वृषभ:
मुलांकडून शुभ वार्ता मिळेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. चारचौघात प्रतिष्ठा कमवाल. सावधगिरी बाळगून व्यवहार करावा.
कर्क:
उत्तम कौटुंबिक सौख्य राहील. आवडीच्या वस्तु खरेदी कराल. परिश्रमाचे चीज होईल. मुलांबद्दलचा विश्वास दृढ होईल. आवडते पदार्थ चाखाल.
सिंह:
धार्मिक गोष्टींकडे कल राहील. गुंतवणूक विचारपूर्वक करावी. क्षुल्लक मुद्दा वादाचा ठरू शकतो. संमिश्र घटना जाणवतील. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.
कन्या:
कार्यालयीन सहकारी उत्तम साथ देतील. तुमच्या कलेचे कौतुक केले जाईल. जोडीदाराला खुश करावे. क्षुल्लक कारणाने नाराज होऊ नका. निर्भीडपणे कामे पूर्ण कराल.
तूळ:
मनातील नसत्या कल्पना काढून टाका. मानसिक आरोग्य जपावे. ग्रहमानाची साथ लाभेल. गोड बोलून कार्यभाग साधाल. आपले विचार ठामपणे मांडाल.
वृश्चिक:
मेहनतीच्या जोरावर कामे कराल. उधारी वसूल करण्याच्या मागे लागा. प्रयत्न अपेक्षेप्रमाणे साथ देतील. लोक तुमचा सल्ला विचारात घेतील. फसव्या लोकांपासून सावध राहावे.
धनू:
धार्मिक कामाकडे कल राहील. अतिगोड पदार्थ खाणे टाळावे. घरात शांतता नांदेल. तुमच्या अनुभवाचा फायदा होईल. भाग्याची उत्तम साथ मिळेल.
मकर:
घरासाठी खरेदी केली जाईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. मौल्यवान वस्तु लाभतील. अनावश्यक खर्च संभवतात. चिकाटीने कामे करावीत.
कुंभ:
तिखट शब्द टाळावेत. सामाजिक प्रतिष्ठा वाढीस लागेल. खर्च मर्यादित ठेवावा. नातेवाईकांची खुशाली कळेल. बौद्धिक कामात लक्ष घालाल.
मीन:
तुमचे मनोबल वाढीस लागेल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. दिवस मनासारखा घालवाल. धडाडीने कामे पूर्ण कराल. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील.