Type Here to Get Search Results !

घरबसल्या मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स; आताचा करा 'असा' अर्ज!



नवी दिल्ली:  चारचाकी किंवा दुचाकी चालवण्यासाठी तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. पण आता घरबसल्या सहजसोप्या पद्धतीनं तुम्ही ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकता. वाहन चालवणाऱ्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे, एक महत्त्वाचं कागदपत्र. जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल, किंवा त रिन्यू करायचं असेल, तर तुम्ही ऑनलाईन झटपट अर्ज करु शकता. 



तुम्हाला शिकाऊ परवान्यासाठी अर्ज करायचा असेल किंवा कायमस्वरूपी परवाना मिळवायचा असेल तर तुम्ही अगदी सहज ऑनलाइन अर्ज करू शकता. तर आता शिकाऊ परवाना मिळवण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन झाली आहे. तसेच, शिकाऊ परवाना डिजिटल पद्धतीनं मिळू शकतो. तर कायमस्वरूपी परवाना मिळवण्यासाठी आरटीओला जावावे  लागते.



कायमस्वरूपी परवाना घेण्यासाठी परिवहन कार्यालयात जावं लागतं. शिकाऊ परवान्यासाठी अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम अधिकृत साइटला भेट द्या.  


येथे तुम्हाला एक संपूर्ण यादी मिळेल ज्यामध्ये तुम्हाला Learner License चा पर्याय निवडावा लागेल. येथे तुम्हाला आधारचा पर्यायही दिसेल. तिथे तुम्हाला तुमच्या आधार कार्डाचे तपशील टाकावे लागतील. यासोबतच मोबाईल नंबरवर एक ओटीपीही येईल. सर्व तपशील टाकल्यानंतर तुम्हाला पेमेंट पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर तुम्हाला 50 रुपयांची फी भरावी लागेल. तुम्ही या प्रक्रियेद्वारे अर्ज केल्यास लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स फक्त 7 दिवसांत थेट तुमच्या घरी पोहोचेल. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies