आटपाडी: आज कोणते महत्वाचे दिवस आहेत हे आपण या दिनविशेषच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
महत्वाच्या घटना खालीलप्रमाणे:
2008 दिल्ली बॉम्बस्फोट
13 सप्टेंबर 2008 रोजी दिल्लीत 30 मिनिटांच्या अंतराने चार ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाले होते. याममध्ये 30 जमांचा मृत्यू झाला होता. तर जवळपास 130 लोक जखमी झाले होते. 13 सप्टेंबरचा हा दिवस देशाच्या इतिहासातील दहशतवादाच्या एका मोठ्या घटनेसह नोंदला गेला आहे.
1985 : सुपर मारियो ब्रदर्स हा व्हिडीओ गेम जपानमध्ये प्रकाशित झाला. गेम्सची सुपर मारिओ मालिका सुरू झाली.
1948 : हैदराबाद मुक्तिसंग्राम ऑपेरेशन पोलो, हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी भारतीय सैन्य हैदराबादच्या हद्दीत शिरले.
1944 : दुसरे महायुद्ध , मेलिगालासची लढाई: ग्रीक पीपल्स लिबरेशन आर्मी (ईएलएएस) च्या ग्रीक प्रतिकार शक्ती आणि सहयोगी सुरक्षा बटालियन यांच्यात लढाईची सुरुवात.
1933 : एलिझाबेथ मॅककॉम्ब्स या न्यूझीलंड संसदेवर निवडून आलेल्या पहिल्या महिला ठरल्या.
1899 : मॅकेंडर, ऑलियर आणि ब्रोचेरेल यांनी केनिया पर्वतरांगेमधील सर्वोच्च शिखर (5119 मी - 17057 फूट) बॅटियनवर पहिल्यांदा चढाई केली.
1898 : हॅनीबल गुडविन यांना सेल्यूलॉइड फोटोग्राफिक फिल्मचे पेटंट मिळाले.