Type Here to Get Search Results !

“न्यायालयाने परवानगी दिली असली तरी....”: उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन!



मुंबई : उच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिवसैनिकांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. उच्च न्यायालयाने कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी ही सरकारकडे दिली असली तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना एक अवाहन केले आहे. 



दसरा मेळावा ही शिवसेनेची गेल्या 66 वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे या तेजस्वी उत्सवाला गालबोट लागू नये.  शिवसेनेच्या परंपरेला अडथळा निर्माण व्हावा यासाठी अनेकजण कामाला लागले होते. त्यामुळे राज्यात अस्थिरतेचे वातावरणही झाले होते. पण अखेर सत्याचा विजय हा होणारच. त्यामुळेच न्यायादेवतेच्या निकालामुळे शिवसेनेची परंपरा अखंडित राहणार आहे.न्यायालयाने परवानगी दिली असली तरी हा सोहळा शांततेत पार पडावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे पक्षप्रमुख म्हणाले आहेत. 



तसेच, कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी जेवढी सरकारची आहे तेवढीच शिवसैनिकांची असेही पक्षप्रमुखांनी सांगितले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies