मुंबई: पेट्रोल-डिझेल, गॅस पाठोपाठ आता भाज्यांचे दर कडाडले आहेत. लहरी पावसाचा शेतीच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या बजेटला कात्री लागली आहे. मुंबईच्या दादर मार्केटमध्ये भाज्यांचे दर तब्बल 40 ते 50 टक्क्यांनी वाढले आहेत. पुरेशी लागवड न झाल्याने गेल्या काही दिवसांपासून भाज्यांची आवक कमी होत आहे.
भाजीपाल्याचे नवीन दर खालीलप्रमाणे:
टोमॅटो - 60ते 70 रुपये प्रति किलो
भेंडी - 60ते 70 रुपये प्रति किलो
कोबी - 50 ते 60 रुपये प्रति किलो
मिरच्या - 60 ते 70 रुपये प्रति किलो
घेवडा - 40ते 50 रुपये प्रति किलो
फ्लॉवर - 60 ते 70 रुपये प्रति किलो
वांगी - आता 60ते 70 रुपये प्रति किलो
काकडी - 40 ते 50 रुपये प्रति किलो