मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि भाजपाला खोचक टोला लगावला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “अनेक वर्षांनी आपल्या देशामध्ये चित्ता हा प्राणी आला आहे. मराठीमध्ये आपण त्याला चित्ता बोलतो आणि इंग्लिशमध्ये चिता बोलतात. आम्ही पेंग्विन आणले म्हणून ते आम्हाला पेंग्विन सरकार म्हणतात. मग आपण त्यांना आता चिता सरकार म्हणायचे का? असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला आहे.
दरम्यान, भारतात अनेक वर्षांनी चित्ता आणण्यात आला आहे. सत्तर वर्षानंतर भारतात प्रथमच चित्ता आल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. यावरून आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि भाजपाला खोचक टोला लगावला आहे.