Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, शुक्रवार १६ सप्टेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष: स्वपराक्रमाने कार्य सिद्धीस न्याल. गृह सजावटीच्या वस्तु खरेदी कराल. नवीन कामास दिवस अनुकूल आहे. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. जुने करार मार्गी लागतील. 



वृषभ:

अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता. नवीन योजनेवर काम चालू करावे. सामाजिक बांधीलकी जपावी. मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल. आपल्या स्मरणशक्तीचा योग्य ठिकाणी उपयोग होईल.



मिथुन:

वरिष्ठ सहकार्यांचे चांगले सहकार्य लाभेल.आपल्या कर्तबगारीवर कामे मिळवाल. अति विचारात अडकून पडू नका.  छोटे प्रवास घडतील. रचनात्मक कमर करण्यावर भर द्यावा. 



कर्क:

जोडीदाराच्या शांत स्वभावाचा अचंबा वाटेल. परिस्थितीशी मिळतेजुळते घ्यावे लागेल. मेहनतीचे तात्काळ फळ मिळेल. घरातील प्रलंबित कामे मार्गी लावाल. अति चौकसपणा दाखवू नका.



सिंह:

प्रेमातील व्यक्तींचा उत्साह वाढेल. आपल्या व्यासंगाचा फायदा होईल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. मुलांकडून आनंदवार्ता मिळतील. आपल्यावर सद्गुणांच्या कौतुकाचा वर्षाव होईल.



कन्या:

कामाचा ताण जाणवेल. आपले विनयशील वागणे लोकांना आवडेल. आत्मविश्वासाने पूर्ण कराल. योग्य शिस्तीचा फायदाच होईल. भावंडांशी चर्चेतून मार्ग काढावा. 



तूळ:

काही समस्या चर्चेतून सोडवाव्या.  नवीन ऊर्जा व उत्साह वाढेल. तुमच्या वागण्याचा प्रभाव पडेल. गोड बोलून कामे साध्य करून घ्याल. हातातील काम शेवटपर्यंत लावून धरा.



वृश्चिक:

नोकरदार वर्गाने कामात नाविन्य आणावे.  जुन्या प्रश्नातून मार्ग काढावा. उत्साहाने कार्यरत राहाल. अति मसालेदार पदार्थ खाऊ नका. कामाच्या नवीन संधीचा फायदा घ्या. 



धनू:

कार्य पूर्ण करण्यात कुशलता मिळवाल. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. चुकून एखाद्यावर अति विश्वास ठेवाल. जोखीम पत्करल्यास लाभ मिळू शकतील. व्यापारी वर्गाला उत्तम दिवस.



मकर:

जोडीदाराचे सहकार्य लाभेल. घरातील काही खर्च निघतील. तज्ञांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. प्रिय व्यक्तीसाठी वेळ काढाल. हातातील कामांची यादी पूर्ण होईल.



कुंभ:

जोडीदाराशी मतभेद दूर होतील. जुन्या कामावर खर्च होईल. विचारांना योग्य दिशा द्यावी. समाजसेवा करण्याची संधी मिळेल. कल्पनेतून बाहेर येऊन कामाला लागावे.



मीन:

सर्व समस्या टप्याटप्याने सुटतील. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. जोडीदाराच्या भावनेचा व मतांचा आदर करावा. खर्चाचा अंदाज बांधावा. व्यापारातील जोखीम सकारात्मक परिणाम देईल. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies