Type Here to Get Search Results !

प्रेमात अडथळा ठरत असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला खून!


चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात एका शिक्षकीने प्रेमात अडथळा ठरत असलेल्या पतीचा पेशान शिक्षक असलेल्या प्रियकराच्या मदतीने खून केला. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, चंद्रपूर शहरातील बालाजी वार्ड या घनदाट वस्तीत राहणाऱ्या मनोज रासेकर यांच्या पत्नीचे स्वप्निस गावंडे नावाच्या एका शिक्षकासोबत प्रेमसंबंध होते. वारंवार आजारी असणारे पती मनोज रासेकर हे दोन्ही आरोपींनी प्रेमाच्या आड येणाऱ्या मनोजच्या हत्येचा कट रचला. प्लानिंगप्रमाणे पत्नीने रात्री घराचे दार उघडंच ठेवलं. मध्यरात्री चोराचा वेष घेत शिक्षक प्रियकर विवाहित प्रेयसीच्या घरात शिरला.



मनोजच्या चेहऱ्यावर उशी कोंबून स्वप्नीलने त्याचा खून केला. आरडाओरडा झाल्याने अखेर दुसऱ्या खोलीत असलेली मनोजची आईदेखील खोलीत घुसली. आता आपला प्लान फसतो की काय, असं वाटत असतानाच शिक्षकाने प्लान बी प्रमाणे वागायचं ठरवलं. अखेर चोरीचा बनाव रचला गेला. ठरल्याप्रमाणे तो चोरीचा प्रयत्न करु लागला.घरातील कपाटामधील दागिने, वृद्ध आईच्या गळ्यातील सोन्याची पोतदेखील धमकावून लुटली आणि घरातून पळ काढला. सकाळी मनोजच्या पत्नीने ठरलेल्या प्लानप्रमाणे पोलीस स्टेशन गाठलं आणि पतीच्या मृत्यूबाबत माहिती दिली. लुटमार झाल्याची प्राथमिक तक्रार पोलिसांना मिळाली.



दरम्यान, मनोजच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर, पोलिसांनी संशय आल्यानं मृत मनोजच्या पत्नीचा फोन तपासला. तिचे कॉल डिटेल्स काढले. यातून अनेक गोष्टींचा उलगडा झाला. अखेर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी या हत्येमागे लव्ह ट्रॅन्गल असल्याचे उघड झाले. पोलिसांनी याप्रकरणी मुख्म आरोपी असलेल्या शिक्षकाला अटक केली. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies