Type Here to Get Search Results !

भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने विनोद तावडे, प्रकाश जावडेकर आणि पंकजा मुंडेंकडे सोपविली मोठी जबाबदारी!



नवी दिल्ली – राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शिंदे गट आणि भाजपाचे सरकार आल्यानंतरही राज्यातील काही मोठ्या नेत्यांना पुन्हा राज्यात संधी मिळणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकींनंतर पंकजा मुंडे, विनोद तावडे हे दोन्ही नेते केंद्रीय राजकारणात सक्रिय झाले आहेत. आता भाजपाने केंद्रीय पातळीवर काही राज्यांच्या प्रभारी आणि सहप्रभारींची नियुक्ती जाहीर केली आहे. त्यात विनोद तावडे यांना बिहारच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पंकजा मुंडे यांना मध्यप्रदेशात सहप्रभारीपदाची आहे तीच जबाबदारी कायम ठेवण्यात आलेली आहे. याबाबतचे पत्रक भाजपाच्या केंद्रीय कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आले आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनाही यात संधी मिळाली आहे. त्यांच्याकडे केरळच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे.



दरम्यान, मध्य प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी दक्षिणेतील मुरलीधर राव यांच्याकडे देण्यात आलेली आहे. तर सहप्रभारीपदी पंकजा मुंडे यांच्यासोबत डॉ. राम शंकर कठेरीया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पंकजा यांच्याकडे गेल्या वेळी दिलेलीच जबाबदारी ठेवण्यात आलेली आहे. तसेच, विनोद तावडे यांना पक्षात मोठी जबाबदारी देण्यात आल्याचे मानण्यात येते आहे. विनोद तावडे यांना हरियाणानंतर आता बिहारची जबाबदारी देण्यात आलेली आहे.तर केंद्रात अनेक मंत्रीपदे सांभाळलेले प्रकाश जावडेकर यांच्याकडे केरळच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. केरळमध्ये डाव्यांचा विरोध मोडून त्याठिकाणी 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाचा शिरकाव करण्यासाठी जावडेकरांना प्रयत्न करावे लागणार आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies