नवी दिल्ली: भारत जोडो यात्रेच्या तयारीनिमित्त नाना पटोले दोन दिवसांपासून अकोला जिल्हा दौऱ्यावर आहेत. बुधवारी सकाळी शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला.
पटोले म्हणाले, “शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं, पिकांची नुकसान होऊनही त्यांना मदत नाही. विकासकामे ठप्प आहे.तसेच, दिल्ली दरबारातील हस्तक असल्याचे जाहीरपणे सांगून महाराष्ट्राचा अवमान केला जात आहे. राज्यातील मालमत्ता गुजरातला नेण्याचे मनसुबे आखले जात आहे. जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर करताना ते ‘स्पायडर मॅन’ असल्यासारखे वाटले आहे. कसा विकास होणार?, येथील नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. सर्व कारभार गुजरातच्या इशाऱ्यावर चालविला जात असल्याने येथील विकास ठप्प झाला असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला.