Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, सोमवार १९ सप्टेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष: 

कार्यक्षेत्रात झालेला बदल स्वीकारावा लागेल. कामामध्ये अतिदक्षता बाळगा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आपल्या विचारांशी ठाम रहा. इतरांना मदत करून समाधान मिळेल. 



वृषभ:

पित्त विकाराचा त्रास संभवतो.  आपण हातात घेतलेले काम पूर्ण होईल. जुन्या मित्राची भेट मन प्रसन्न करेल. इतरांकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल. कुटुंबासमवेत वेळ चांगला जाईल. 



मिथुन:

हातातील कलेचे कौतुक केले जाईल. आपला निर्णय इतरांवर लादू नका. बौद्धिक कौशल्य दाखवायला मिळेल. उच्च अधिकार्‍यांचे सहकार्य मिळेल. दिनक्रम व्यस्त राहील. 



कर्क:

व्यावसायिक योजनांना गती मिळेल.  अडकलेली येणी वसूल होतील. अपचनाचा त्रास संभवतो. आर्थिक स्थिती चांगली राहील. समोरच्या व्यक्तीचा आदर करावा. 



सिंह:

व्यापार, उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना लाभ मिळतील. नवीन गोष्टींचे दडपण घेऊ नका. आहारावर नियंत्रण ठेवावे. आपला आत्मविश्वास जागृत ठेवावा. मुलांच्या जबाबदार्‍या सक्षमतेने पूर्ण कराल. 



कन्या:

विरोधक नामोहरम होतील. कामाचा आधी संपूर्ण अभ्यास करावा. वैवाहिक जीवन सुखमय होईल. गरज वाटल्यास तज्ञांचा सल्ला घ्यावा. चांगल्या गोष्टींसाठी झालेला खर्च मन प्रसन्न करेल. 



तूळ:

करमणुकीकडे अधिक लक्ष राहील. अडचणीच्या काळात मनातील व्यक्ती साथ देईल. उत्पन्नाचे नवीन साधन उपलब्ध होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मनातील विचार इतरांना बोलून दाखवा.



वृश्चिक:

मित्राची भेट समस्येचे निराकरण करणारी ठरेल. कोणाच्या दडपणाखाली राहू नका. आर्थिक बाजू भक्कम होईल. सन्मानात वाढ होईल. ठामपणे आपले विचार मांडाल.



धनू:

जवळचा प्रवास घडेल. काम अधिक वेळ ताणू नका. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. आर्थिक व्यवहारात दक्षता बाळगा. तुमचा सल्ला लोक विचारात घेतील.



मकर:

व्यवसायिकांना अनुकूल दिवस. वाहन चालवताना सावध राहावे. तुमच्या कामात कुशलता दिसून येईल. आर्थिक बाजू भक्कम होईल. नवीन कार्य करण्याची तयारी दाखवाल.



कुंभ:

खरेदी-विक्रीच्या व्यवहारात हित लक्षात घ्या. दिवस धावपळीचा राहील. संयमाने परिस्थिती हाताळावी लागेल. स्वत:साठी देखील वेळ काढावा. अवघड गोष्टीत अनुभवी लोकांचा सल्ला घ्यावा.  



मीन:

लहान प्रवास सत्कारणी लागेल. कोणत्याही कामाचा तिटकारा करू नका. मनाची व्यग्रता टाळण्याचा प्रयत्न करावा. बोलतांना भान विसरू नका. जोडीदाराचा पाठिंबा राहील. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies