Type Here to Get Search Results !

शाळेच्या लिफ्टमध्ये अकडून शिक्षिकेचा मृत्यू!



मुंबई:मालाड पश्चिमेत चिंचोली पाठक जवळ असलेला सेंट मेरी इंग्लिश स्कूलमध्ये काल दुपारी शुक्रवारी, 16 सप्टेंबर दोन वाजताच्या सुमारास एका वर्गातील तास संपवल्यानंतर दुसऱ्या वर्गात जाण्यासाठी निघालेल्या शिक्षिकेचा शाळेतील लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जेनेली फर्नांडिस (वय, 26) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, फर्नांडिस या जून-2022 पासून सेंट मेरी इंग्लिश स्कूलमध्ये सहशिक्षिका या पदावर कार्यरत होत्या. दरम्यान, जेनेली फर्नांडिस या काल दुपारी दोन वाजताच्या सुमारास एका वर्गातील तास संपवल्यानंतर दुसऱ्या वर्गात जाण्यासाठी निघाल्या. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे दरवाजा बंद होण्याआधीच लिफ्ट वरच्या दिशेने जाऊ लागली. लिफ्टमध्ये अडकल्याने जेनेली या गंभीर जखमी झाल्या. 



दरम्यान, फर्नांडिस यांना तात्काळ नजीकच्या लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मालाड पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies